स्तब्ध आकाशी उषेने
मुक्त यावे
पाखरांनी
पानजाळीतून गावे
सागराने श्रावणाचा
मेघ व्हावे
अंतरीचे
चिंब ओले दान द्यावे
पावसाने काळजाशी
ऊन घ्यावे
या नभाला
सप्तरंगी स्वप्न द्यावे
या नभाने चांदण्यांची
शाल ल्यावी
मोजताना
या भुईला नीज यावी
- मंदार.
No comments:
Post a Comment