शुक्रास लाजून
पश्चिमा आरक्त
केवळ ही निमित्त
संध्याकाळ
अजून पूर्वेलासूर्याचा आठवमनात साठवसंध्याकाळ
केसांत गारवा
मनाचा पारवा
लाटांत मारवा
संध्याकाळ
सूर्याच्या तेजाळदानास जागतेचांदणे पेरतेसंध्याकाळ
पाखरांची पुन्हा
थांबली कुजबूज
आठवांचे गूज
संध्याकाळ
आता हात सुटेखोल काही तुटेशेवटची भेटेसंध्याकाळ
- मंदार.
No comments:
Post a Comment