श्वासांमधलं अंतर तू
चांदणगच्च अंबर तूयुगायुगांची तहान मी
कातळांतला पाझर तू
संध्याकाळी कातर मी
ज्योती ज्योती सावर तू
महाभारता कारण मी
पार्थाचा योगेश्वर तू
चिंता, शंका, संभ्रम मी
साऱ्या प्रश्नांचं उत्तर तू
- मंदार.
घेई मधु-छंद मिलिंद जैसा, भ्रमरैक साहित्यकुसुमी मी तैसा ..
No comments:
Post a Comment