माझे मास्तर फार म्हणजे फारच व्यस्त असतात. (ह्या ’व्यस्त’तेचा त्यांच्या आणि माझ्या कामाच्या प्रमाणाशी काहीही संबंध नाही!)
तर त्यांच्यासाठी मी एक ’धावा’ लिहिलाय -
(मूळ गीत: एकवार पंखावरुनी ..)
(गदिमांची माफी मागून):
एकवार मसुद्यावरुनी फिरो तुझा हात
कामाचे सार्थक माझ्या, तुझ्या स्वाक्ष-यांत
विद्यापीठी अवघा फिरलो
तुझ्या हापिसाशी बसलो
उपाहारगृही केव्हां, कधी व्हरांड्यात
वर्ग, प्रयोगशाळा ही
धुंडाळल्या त्या बागाही
तुझ्याविना नव्हते कोणी, माझिया मनात
फुशारून जाउन कोणी
तुझ्यापुढे नाचे ’राणी’
तुझ्यासवे बोलत बसतो, कुणी भाग्यवंत
मुका बावरा मी भोळा
पडेन का तुझिया डोळा ?
कधिही सांग, तेव्हां येइन तुझ्या हापिसात
Monday, March 03, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
good one! Jr. Baba Velankar in
progress...
"वर्ग, प्रयोगशाळा ही" this is the only line i could not sing properly.. : "Vruttat" basat nahi :P :P
nice one..if i may suggest kindly make available the original poem also..(magach mi yogya ti teeka karin :PP)
वृत्ताबद्दल बरोबर म्हणतोय मिलिंद..
'प्रयोग-गृहांच्या ठायी.
वर्ग शोधले- बागाही!'
असं काहीतरी केलं आणि प्रयोग च्या 'ग' वर भार टाकला तर साधारण मूळ चालीत म्हणता येईल ते कडवं.
(प्रयोग हा अगदीच आडमुठा शब्दय!)
बाकी विडंबन छान. कितपत स्वानुभवजन्य आहे?
sahi :)
Post a Comment