"अळीमिळी गुपचिळी," - तुझी शपथ आगळी -
"गाणी नि:शब्द ओळींची, सारे शब्दावीण" - खुळी!
"देणी ओठांनी द्यायची घेणी कुशीत घ्यायची
देहावरची वळणं अंगुळ्यांनी वाचायची
श्वासांमधली शांतता कानी टिपून घ्यायची
गळां आलेली कहाणी दिठीतून सांगायची
पहाटेस अधरांनी गालबोट लावायचं
सांजवात ओंजळीत हसू उजळवायचं
पश्चिमेच्या सांगाव्याचं गाणं गळा माळायचं
माझ्या शुभ्र कळ्यांतलं तू रे केशर व्हायचं"
- मंदार.