Sunday, November 10, 2024
दीपावली
तुझ्या मेंदीस चढतो रंग रांगोळीतला
तुझा गंधार कोमल धुंद संगीतातला
हिरे मोत्यांसही हसणे तुझे झाकोळते
तुझ्या गाली खळ्यांची रोषणाई वेधते
अमावस्येस दिसतो चेहऱ्याचा चांदवा
फिकी पडते मिठाई काय ओठी गोडवा!
तुझ्या डोळ्यांमध्ये लाखो दिवे तेजाळती
तुझ्या स्पर्शात गात्रे चंदनी गंधाळती
कपाळी कोरली माझ्याच नावे चांदणी
तुझ्या हातात माझ्या प्राक्तनाची लेखणी
तुझ्यासंगे सुखाने रूपगंधे भोगिली
अशी उजळून गेली जीवना दीपावली
- मंदार.
Subscribe to:
Posts (Atom)