Monday, October 12, 2009

तो. मी. आपण.

जुने ते मुळांतून छाटीत जातो
नवी रोपटे तेथ लावीत जातो

जुनी प्रश्नचिन्हे पुन्हा पाहताना
नव्या ठोकताळ्यांस मांडीत जातो

जुन्याचा जराही कधी भास होता
नव्याची मनी दृष्ट काढीत जातो

जुन्या चित्रमालेतले रंग उडले
नवे गोजिरे रूप रेखीत जातो

जुने बंध सुटले, गडी तो नव्याने
नवे राज्य घेण्यास शोधीत जातो

- मंदार.

1 comment:

Anonymous said...

जुनी प्रश्नचिन्हे पुन्हा निरखताना
निरखताना -> देखताना ?