Thursday, October 15, 2009

दीप-दान

फुलवाती विसरून
चांदण्यांत रमे ज्योती
पुन्हा प्रकाशाची वाट
स्निग्ध समया पाहती

शमलेल्या समयांच्या
ज्योती ज्योतींनी पेटवा
सोनतेजाच्या दूतांना
त्यांची लेकुरे भेटवा


दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! :-)

- मंदार.

1 comment:

Saee said...

खूप खूप शुभेच्छा!!
Let this Diwali light a thousand lamps in your heart too!! Keep writing!!