आज कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन. १९४२ च्या लढ्यात "गर्जा जयजयकार क्रांतीचा" लिहिणारे कुसुमाग्रज. नटसम्राट सारखं नाटक ज्यांच्या लेखणीतून उतरलं, ते कुसुमाग्रज. एका बाजूला दिसतात कोलंबसाचे गर्वगीत, पृथ्वीचे गर्वगीत, मातीची दर्पोक्ती अशा कविता तर दुसरीकडे कालिदासाच्या मेघदूतातल्या रचनांवर आधारित कविता. त्यांनी लिहिलेलं वाचण्याचा आनंद नाही सांगता यायचा शब्दात.
इथे त्यांच्या कवितांचा संग्रह तुम्ही पाहू शकाल.

"चला उभारा उंच शिडे ती गर्वाने वरती,
कथा या खुळ्या सागराला,
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा,
किनारा तुला पामराला ! "
2 comments:
:) Is the signed pic from your own collection?
नाही, ते छायाचित्र 'जाली' आहे - आंतर'जाला'वरून घेतलंय :D
Post a Comment