(खरेभाऊंची माफी मागून)
अताशा असे हे मला काय होते
कुण्या काळची झोप डोळ्यांत येते
बरा वाचता वाचता पेंगतो मी
अशी लेखणी हातुनी खालिं पडते
कधी आवरू पुस्तकांचा पसारा
कधी सावरू तो टीपांचा ढिगारा
असे चालती हात हे संथ माझे
गोंधळात ह्या वेंधळा मी बिचारा
न लेखांक कुठले, न संदर्भ काही
न कुठले परिच्छेद, सूत्रे न काही
जसा दारुडा जाइ रस्त्यावरूनी
तसा काहिसा काटतो मार्ग मीही
असा ऐकु ये मास्तरांचा पुकारा
क्षणी दूर हो आळशी नूर सारा
असे ढवळते आत जोरात काही
जसा बैल घे आसुडाचा इशारा
कशी ही अवस्था कुणाला कळावे?
कुणाला पुसावे ? कुणी उत्तरावे ?
किती रोज करतो, तरी काम उरते
असे काम उरता, कुणी आटपावे ?
मंदार.
Friday, July 11, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
6 comments:
arbit but sweet :)
mahir zalays widambanaat!
erwich phoDla khare la... tyacha kasa 'bhagel' ashyane? :P
kashyane re zali tuzi hi awastha?
hey! bhaari awadli :)
sahi re!
@ सगळे:
धन्यवाद! :-)
@ मकरंद: अरे, खरेभाऊंचं एरवीच ’भागत’ असेल आता. आणि मला असले प्रश्न पडणं बहुतकरुन बंद झालंय आता!
@मधुरा: आता हे समजत असतं तर कुठल्या कुठे असतो आज!
Post a Comment