Monday, July 28, 2008

तीन तिघाडा

घशाखाली भाकरी घालून तो जरा पडला
ती बाहेर उन्हात गोव-या वाळवत होती

तीच वाळली, गोव-या ओल्या आणि तो कोरडा राहिला.

----------------

बहात्तर कुमारिकांपायी पडतायत
रोज असंख्य जीवांच्या आहुती

ते यज्ञ कधीपासून करायला लागले?

-----------------

सीतेसंगे स्वर्ग भासे वनवास रामाचा
कर्तव्या जागुन आत्मा होई धन्य लक्ष्मणाचा

प्रासादी राहुन वनवास होता - फक्त उर्मिलेचा



मंदार.

1 comments:

Harshada Vinaya said...

सीतेसंगे स्वर्ग भासे वनवास रामाचा
कर्तव्या जागुन आत्मा होई धन्य लक्ष्मणाचा

प्रासादी राहुन वनवास होता - फक्त उर्मिलेचा

हे खूप पटले, नेहमीच वाटायंचं..
उर्मिला तशी दूर्लक्षीतच राहीली.. त्यामूळे तिच्या वेदना पोहोचल्याच नाहीत, आपल्यापर्यंत..